Tue Nov 12 23:27:38 UTC 2024: ## हडपसरमध्ये महाविकास आघाडी उमेदवार प्रशांत जगतापांची पदयात्रा आणि बाईक रॅली
**हडपसर:** महाविकास आघाडीचे हडपसर मतदारसंघातील उमेदवार प्रशांत जगताप यांची केशवनगर-मुंढवा परिसरात पदयात्रा व बाईक रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. त्यांच्या या प्रचार मोहिमेला नागरिकांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.
जगताप यांनी ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन या प्रचार मोहिमेचा शुभारंभ केला. भोसले गार्डन येथील मध्यवर्ती निवडणूक कचेरीपासून सुरू झालेली ही पदयात्रा केशवनगर-मुंढवा या भागातून गेली. नागरिकांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले. माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करून त्यांना विजयी भवचा आशीर्वाद दिला.
या पदयात्रेत माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, समाजवादी नेते प्रा. सुभाष वारे, शिवसेना उपशहर प्रमुख समीर तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रविण तुपे, काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप तुपे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगताप यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांशी संवाद साधला. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारीच्या जयघोषाने परिसरात चैतन्य पसरले होते. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते.