Sat Oct 05 06:17:29 UTC 2024: ## मोदी आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील 3900 कोटी रुपये
**पुणे:** प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज, शनिवारी (5 ऑक्टोबर) वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १८ व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण करणार आहेत. या कार्यक्रमात सुमारे 3900 कोटी रुपये 91.52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
पीएम किसान योजने अंतर्गत, प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षातून सहा हजार रुपये, तीन समान हप्त्यात जमा केले जातात. फेब्रुवारी २०१९ पासून सुरू असलेल्या या योजनेद्वारे सप्टेंबर २०२४ अखेर राज्यातील जवळपास १.२० कोटी शेतकरी कुटुंबांना १७ हप्त्यांमध्ये सुमारे 32000 कोटी रुपये जमा झाले आहेत.
राज्यात 2023-24 पासून सुरू असलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेद्वारे, राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेद्वारे 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात 91.45 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर 6949.68 कोटी रुपये जमा झाले आहेत.
आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या 3900 कोटी रुपयांपैकी 1900 कोटी रुपये पीएम किसान योजनेतून तर 2000 कोटी रुपये नमो शेतकरी महासन्मान योजनेतून जमा होणार आहेत.